PM Modi : पुणेकरांनो गैरसोय टाळा! शहरात पंतप्रधान मोदींच्या सभेमुळे वाहतुकीत बदल, कोणते रस्ते राहणार बंद? जाणून घ्या…


PM Modi पुणे : सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यात सभा होणार आहे. यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही सभा पुण्यातील रेसकोर्स मैदानावर होणार आहे. या सभेसाठी भाजप आणि मित्रपक्षांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. या सभेत ते काय बोलणार हे ऐकण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

या सभेमुळे पुण्यातील रस्ते वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळपासूनच नियोजित रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद राहील. यामुळे गैरसोय होऊ नये यासाठी मार्ग माहिती असणे आवश्यक आहे.

पुणेकरांना पर्यायी रस्त्यांचा वापर करावा लागेल. या सगळ्यामुळे पुणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामध्ये सोलापुर रोडवरील अर्जुन रोड जं. ते टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार रस्ता बंद, तसेच बिशप स्कूल सर्कल ते टर्फ क्लब चौक रस्ता बंद राहणार आहे. तसेच टर्फ क्लब मुख्य प्रवेशद्वार ते टर्फ क्लब चौक, रस्ता बंद राहणार आहे. PM Modi

तसेच यावेळी पुणेकरांना पर्यायी मार्ग उपलब्ध करण्यात आले आहेत. यामध्ये गोळीबार मैदान चौक लुल्लानगर ते इच्छित स्थळी, भैरोबानाला ते लुल्लानगर ते इछित स्थळ, वॉर मेमोरीयल ते घोरपडी ते डोबारवाडी मार्गे बी.टी. कवडे रोडने इच्छित स्थळी असणार आहे.

तसेच मोरओढा सदन कमांड कौन्सिल हॉल ब्लू नाईल मार्गे इच्छित स्थळी, असा मार्ग असणार आहे. दरम्यान, पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा. त्यासाठी पुण्यात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!