चाय पे झालं आता परीक्षा पे चर्चा ! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २७ जानेवारीला विद्यार्थ्यांशी संवाद…!
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुरू केले. यामध्ये चाय पे चर्चा एक महत्वाचा कार्यक्रम आहे. आता ते परीक्षा पे चर्चा कार्यक्रमांतर्गत इयत्ता ९ वी ते १२ वी दरम्यानच्या विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांशी संवाद साधणार आहेत.
यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. नवी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडियममध्ये हा कार्यक्रम होणार आहे. तसेच या दिवशी विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन देखील करण्याचे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने प्रत्येक स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.
दरम्यान, या कार्यक्रमाचे थेट ऑनलाईन प्रक्षेपण देशातील प्रत्येक शाळेत केले जाणार आहे. यासाठी सर्वांना आदेश देण्यात आले आहेत. यासाठीची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे.
चित्रकला स्पर्धेसाठी किमान ५०० ते १००० विद्यार्थी एकत्र बसू शकतील, अशा शाळेचे मोठे सभागृह, मैदान, मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान शक्य असल्यास तालुका स्तरावर स्पर्धेचे आयोजन करण्याची सूचना देण्यात शिक्षण आयुक्तालयाकडून करण्यात आली आहे.