PM Modi : राज्यात होणार तब्बल 701 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे उद्घाटन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार शुभारंभ…

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 4 ऑक्टोबरला मुंबई दौऱ्यावर येणार आहे.

तसेच या दौऱ्यावेळी पीएम मोदी शहरातील पहिला भूमिगत मेट्रो मार्ग, ठाणे खाडी पुल कॉरिडॉर, समृद्धी द्रुतगती मार्गाचा अंतिम टप्पा यां तीन महत्त्वाकांक्षी आणि मोठ्या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत.
तसेच ठाणे रिंग रोड प्रकल्पाची पायाभरणी देखील केली जाणार आहे. ज्या भूमिगत मेट्रो मार्गाची वाट पाहिली जात होती त्याची आता मुंबईकरांना भेट मिळणार आहे. मेट्रो मार्ग 3 या मेट्रो मार्ग प्रकल्पाचा पहिला टप्पा अर्थातच आरे ते बीकेसी हा १२ किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू होणार आहे.

या पहिल्या टप्प्यात दहा स्थानके विकसित करण्यात आली आहेत. खरे तर हा संपूर्ण मेट्रो मार्ग ३३.५ किलोमीटर लांबीचा आहे. या संपूर्ण मेट्रो मार्गावर एकूण २७ स्थानके तयार केली जाणार असून यापैकी २६ स्थानके भूमिगत आणि एक स्थानक जमिनीवरील राहणार आहे. येत्या काही दिवसांनी या प्रकल्पाचा पहिला फेज सुरू होणार आहे आणि नंतर जून २०२५ पर्यंत या प्रकल्पाचा दुसरा सुरू केला जाईल.
या मेट्रो मार्गाचा पहिला टप्पा ४ ऑक्टोबरला सुरू केला जाणार अशी खात्रीलायक बातमी हाती आली आहे. यामुळे मुंबईकरांचे भूमिगत मेट्रोचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार हे स्पष्ट होत आहे. खरे तर या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी तीन आणि पाच ऑक्टोबर ही तारीख विचारात घेतली गेली होती. PM Modi
मात्र पीएमओ ऑफिस कडून चार ऑक्टोबर ही तारीख फायनल करण्यात आली आहे. आता या तारखेला मुंबईला पहिल्या भूमिगत मेट्रो मार्गाची भेट मिळणार आहे. एवढेच नाही तर समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरु होणार आहे. समृद्धी महामार्ग हा 701 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्प आहे.
या प्रकल्पाचा ६२५ किलोमीटर लांबीचा टप्पा सध्या वाहतुकीसाठी सुरू आहे. सुरुवातीला डिसेंबर २०२२ मध्ये समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा अर्थातच नागपूर ते शिर्डी हा ५२९ किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू झाला. यानंतर २०२३ मध्ये शिर्डी ते भरवीर हा ८० किलोमीटर लांबीचा टप्पा वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.
