मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता लवकरच जमा होणार; असा करा स्टेटस चेक..


नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नुकताच मिळाला असताना, ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून मोठे संकट निर्माण केले आहे. या पावसामुळे गहू आणि इतर अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांचे लक्ष पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याकडे लागले आहे.

केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत दरवर्षी 6,000 रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जातात. ही रक्कम 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये डीबीटी पद्धतीने दिली जाते.

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी 23 वा हप्ता लवकरात लवकर जमा होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. आता सरकार हा हप्ता नेमका कधी जमा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत हप्ता साधारणतः चार महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जातो. 22 वा हप्ता मार्च महिन्यात वितरित करण्यात आल्यामुळे, त्यानुसार पुढील 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तथापि, या संदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. नेहमीप्रमाणे, हप्त्याची तारीख आधी जाहीर केली जाते आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते एका क्लिकवर देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा केला जातो. डीबीटी प्रणालीमुळे ही रक्कम थेट आणि जलद गतीने शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते, त्यामुळे पारदर्शकता आणि वेग या दोन्ही बाबींना मोठा फायदा होतो.

पीएम किसान योजनेत बोगस लाभार्थी शिरकाव करू नयेत यासाठी सरकारकडून काटेकोरपणे पडताळणी केली जाते. यासाठी शेतकऱ्यांना नियमितपणे काही महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. जे शेतकरी ई-केवायसी आणि भू-सत्यापन वेळेवर पूर्ण करत नाहीत, त्यांच्या खात्यात योजनेचा हप्ता जमा होत नाही.

तसेच, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे किंवा केवायसी अपूर्ण असणे यामुळेही हप्ता अडकू शकतो. त्यामुळे जुलै महिन्यात अपेक्षित असलेला 23 वा हप्ता वेळेत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण करून कोणताही हलगर्जीपणा करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

असा करा स्टेटस चेक

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार असून, लाभार्थी यादीत नाव असल्यास त्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होतात. हा लाभ मिळणार आहे की नाही, हे शेतकरी घरबसल्या सहज तपासू शकतात.

स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत..

सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट pmkisan.gov.in वर जा.
होमपेजवर ‘Farmer Corner’ (शेतकरी कॉर्नर) हा पर्याय निवडा.
त्यानंतर ‘Beneficiary List’ (लाभार्थी यादी) वर क्लिक करा.
येथे तुमचा आधार क्रमांक किंवा खाते क्रमांक प्रविष्ट करा.
त्यानंतर ‘Get Data’ वर क्लिक करा.
पुढे Payment Status वर क्लिक करून तुमचा हप्ता जमा झाला आहे की नाही ते तपासा.

या प्रक्रियेद्वारे शेतकरी आपल्या खात्यात हप्ता जमा होणार आहे का, याची खात्री सहज करू शकतात.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!