PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात आज जमा होणार ४००० रुपये, पैसे आलेत की नाही असे करा चेक..
PM Kisan Yojana : ऐन सणासुदीच्या काळात राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा १८ वा हप्ता मिळणार आहे. केंद्र सरकारच्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आज ५ ऑक्टोबरला म्हणजेच आजच १८ व्या हप्त्यातील २००० रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.
तसेच याच बरोबर, महाराष्ट्र सरकारच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेअंतर्गत देखील २००० रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना एकूण ४००० रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या पाचव्या हप्त्याचा वितरणाचा शुभारंभ होणार आहे. यामध्ये राज्यातील सुमारे ९१ .५३ लाख लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दोन्ही योजनेतून मिळालेल्या ४००० रुपयांची रक्कम जमा होणार आहे. PM Kisan Yojana
दरम्यान, या योजनेच्या अंतर्गत, शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. आतापर्यंत सरकारने १७ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले आहेत. पीएम किसान सन्मान योजनेची सुरुवात २०१९ च्या निवडणुकीपूर्वी झाली होती.
या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य देणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे. महाराष्ट्र शासनाने देखील याच धर्तीवर नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली होती.
पैसे जमा झाले की नाही ते असे तपासा..
सर्वात अगोदर पीएम-किसान पोर्टल ‘https://pmkisan.gov.in’ वर जा.
या ठिकाणी ‘फार्मर कॉर्नर’ वर जाऊन ‘बेनिफिशिअरी स्टेटस’ वर क्लिक करा.
या ठिकाणी आधार क्रमांक, खाते क्रमांक वा मोबाईल क्रमांक टाका.
आता खालील कॅप्चा कोड टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
त्यानंतर ‘गेट स्टेटस’ क्लिक करा.
ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीएम-किसान खात्यात रक्कम जमा झाली की नाही हे कळेल.