पीएम किसानचे पैसे ‘या’ दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा, केंद्रीय कृषिमंत्र्यांची माहिती…

नवी दिल्ली : पीएम किसान सन्मान निधी योजना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेचा अठरावा हप्ता हा ऑक्टोबर 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. यामुळे आता 19 वा हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता याबाबत माहिती अशी की, 5 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्यातील वाशिम येथून हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला. आता या योजनेचा पुढील 19 वा हप्ता हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.
याबाबत कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता २४ फेब्रुवारीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करणार आहेत. पंतप्रधान मोदी हे बिहारमधून या हप्त्याचं वितरण करणार आहेत. यामुळे याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी. दरम्यान, पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्रातील सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2019 मध्ये झाली असून या अंतर्गत या योजनेच्या पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयाचा लाभ दिला जात आहे.
एका आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांचे एकूण तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये लवकरच पैसे टाकले जाणार आहेत.