उड्डाण केल्यानंतर 5 मिनिटातच प्लेन क्रॅश, अधिकृत माहिती आली पुढे, विमानातील 242 प्रवाशांसह हॉस्टेलमधील 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू?


अहमदाबाद : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कोसळले आहे. हा देशातील सर्वात मोठा विमान अपघात असल्याचे सांगितले जात आहे. मेघानीनगर परिसरात  प्रवासी विमान कोसळलं असून रहिवासी परिसरात विमान कोसळल्याची प्राथमिक माहिती आहे. या विमानात माजी मुख्यमंत्री विजय रूपानी देखील असल्याचे सांगितले जात आहे. यामध्ये 242 प्रवासी असल्याचे सांगितले जात आहे.

हे विमान पडल्यानंतर मोठा स्फोट झाला असून याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. एअर इंडियाचं विमान असल्याचे समजते. विमानाने अहमदाबादहून दुपारी 1 वाजून 38 मिनिटांनी धावपट्टी 23 वरून टेकऑफ केले होते. धावपट्टी 23 वरून टेक ऑफ केल्यानंतर लगेचच विमान जमिनीवर कोसळले.

अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये असे दिसतेय की, विमानाने टेकऑफ केले आणि नंतर तब्बल 625 फूट उंचीवर पोहोचले असतानाच काही क्षणातच हे विमान खाली कोसळले. घटनेनंतर काही क्षणातच तीन अग्निशमन गाड्या तात्काळ घटनास्थळी रवाना झाल्या आहे. विमान अपघाताच्या कारणांबाबतही अद्याप स्पष्टता नाही. प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याबाबत आता नागरी उड्डयन महासंचालनालय (DGCA) ने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, एअर इंडियाच्या B787 ड्रीमलायनर विमानाने 1:38 वाजता अहमदाबादहून टेकऑफ केले. ADS-B डेटा नुसार, विमान 625 फूट उंचीवर पोहोचले आणि नंतर ते 475 फूट प्रति मिनिट या वेगाने खाली कोसळले.

विमानात 2 पायलट आणि 10 केबिन क्रूसह 242 लोकं प्रवास करत होते. या विमानाचे कॅप्टन सुमित सबरवाल आणि फर्स्ट ऑफिसर क्लाइव्ह कुंदर यांनी केले होते. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी व प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. विमानातून तब्बल 242 प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. याबाबत तपास सुरू आहे.

तसेच विमान ज्याठिकाणी कोसळे त्या हॉस्टेलमधील 20 विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. विमान जिथे क्रॅश झालं, त्याठिकाणी धुराचे मोठे लोळ पसरल्याचं दिसून येत आहे, घटनास्थळी बचाव पथक पोहोचलं आहे. मोठा भीषण अपघात असल्याचे सांगितले जात असून अनेक गाड्यांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये मोठी मृत्यूहानी देखील झाल्याचे सांगितले जात आहे.

लंडनला म्हणजे दूर मार्गावर जाणार असल्याने या विमानत इंधन देखील मोठ्या प्रमाणात भरण्यात आलं होतं, त्यामुळे अपघातानंतर दुर्घटना पेट घेतला. रहिवासी भागात हे विमान कोसळले आहे. एका इमारतीवर हे विमान कोसळले असल्याचे सांगितले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!