शेवाळवाडी नाक्याजवळ पिस्तुलातून गोळीबार ! ठेका घेतला म्हणून दुसऱ्या ठेकेदारावर गोळीबार !!

HADPSAR : सिक्युरिटी गार्डच्या ठेक्याच्या वादातून दुसऱ्या ठेकेदारावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना शेवाळवाडी (ता. हवेली) नाक्याजवळील संपन्न होम गेटच्या समोर घडली आहे. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी काही तासांतच ताब्यात घेतले आहे .

या गोळीबारात एका ठेकेदाराच्या पायाला गोळी लागून जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपीच्या मुसक्या आवळण्यास हडपसर पोलिसांना यश आले आहे.

सुधीर रामचंद्र शेडगे (रा.शेवाळवाडी, ता. हवेली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तर जयवंत खलाटे (रा. गोंधळेनगर, हडपसर) असं जखमी व्यक्तीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत खलाटे व सुधीर शेंडगे हे दोघेही सिक्युरिटी गार्डचे ठेके घेतात. ठेके घेण्याच्या वादातून दोघांमध्ये किरकोळ वाद झाला. या वादातून ऋषिकेश शेंडगे व सुधीर शेंडगे या दोन जणांनी छऱ्याच्या बंदुकीने जयवंत खलाटे यांच्यावर दोन गोळीबार केले.
या गोळीबारात शेडगे यांच्या पायाला गोळी लागून जखमी झाले. खलाटे यांना एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेची माहिती मिळताच, हडपसर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. हडपसर पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे.
