मोठी बातमी! निवडणूक चिन्हातून पिपाणी चिन्ह कायमचे रद्द, शरद पवार गटाला सर्वात मोठा दिलासा…

मुंबई : सध्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे यामध्ये पिपाणी हे चिन्ह कायमचे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामुळे शरद पवार गटाचे मताचे विभाजन होणार नाही. याबाबत शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली आहे.

आमदार रोहित पवार म्हणाले, निवडणूक चिन्हातून पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार..! लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत या पिपाणीचा खूप मोठा फटका आम्हाला सहन करावा लागला. हाच निर्णय लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत घेतला असता तर आजचं चित्र खूप वेगळं असतं.

पण असो! देर आए दुरुस्त आए..! अशी पोस्ट त्यांनी केली आहे. लोकसभा निवडणुकीत या चिन्हामुळे तुतारीला मोठा फटका बसला. यामध्ये सातारा लोकसभा निवडणुकीत या चिन्हामुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. तसेच विधानसभा निवडणुकीत देखील असाच प्रकार घडला.

यामुळे याबाबत पक्षाकडून अनेकदा मागणी केली जात होती. अखेर याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेतला आहे. याबाबत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी देखील माहिती दिली आहे. यामुळे येणाऱ्या काळात तुतारीसारखे दिसणारे चिन्ह पिपाणी मतदान पेटीवर दिसणार नाही. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
