अजित दादांच्या विमान अपघाताबद्दल पिंकी माळीच्या वडिलांचा धक्कादायक खुलासा; हा घातपातच….


पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. त्यांच्याबरोबरच पिंकी माळी हिचाही मृत्यू झाला. त्यानंतर आता तिचे वडील शिवकुमार माळी यांनी बारामतीमधील अपघाताच्या अनुषंगाने सनसनाटी आरोप केला आहे.हा अपघात नाही तर घातपातच होता, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

त्यांनी असे म्हटले आहे की,याआधी माझ्या लेकीने चार वेळा अजित दादांबरोबर काळ्या आणि करड्या रंगाच्या विमानातून प्रवास केला होता. अपघाताच्या दिवशी मात्र पांढऱ्या रंगाचे विमान का दिले असा सवालही त्यांनी केला आहे.तसेच वाहतूक कोंडीमुळं पायलट पोहोचू शकला नव्हता हा दावाही खोडून काढत मुंबईत सकाळी ६ वाजता कोणत्या भागात ट्राफिक असते? असा सवाल पिंकी माळीच्या वडीलांनी उपस्थित केला आहे.

कालच रोहित पवार यांनी या अपघाताच्या अनुषंगाने विमान कंपनीच्या मालकाला प्रश्न विचारून कंपनीच्या कारभारावर शंका उपस्थित केली. या पत्रकार परिषदेची देशभरात चर्चा होत असताना अजित पवार यांच्यासोबत अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी हिच्या वडिलांनी देखील अपघात नसून घातपातच असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या विमान अपघातात मृत्यू पावलेल्या पिंकी माळी हिच्या कुटुंबीयांना कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही.अपघाताच्या दिवशी फक्त वैमानिक नाही तर विमानही बदलले गेले होते, असा दावा शिवकुमार माळी यांनी केला आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!