Pimpri News : मोठ्याने शिव्या का दिल्या? जाब विचारला म्हणून पेट्रोल टाकून महिलेची जाळली दुचाकी, पिंपरी येथील घटना…

Pimpri News : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढंच नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत.सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.
मोठ्याने शिव्या का देतो, असे विचारल्याचा राग आल्याने महिलेची दुचाकी पेट्रोल टाकून आग लावून जाळली. ही घटना बुधवारी पहाटे चारच्या सुमारास खेड येथे घडली. याप्रकणी एकला अटक करण्यात आली आहे. Pimpri News
समीर रेहमत अन्सारी (रा. चाकण, खेड) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकणी लता अरुण जाधव (वय. ५७) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, जाधव यांचा मुलगा सुहास आणि शेजारी राहणारा आरोपी समीर यांच्यात दीड महिन्यांपूर्वी शिव्या देण्यावरुन शाब्दिक चकमक झाली. सुहासने आरोपी समीरला मोठ्याने शिव्या का देतो असे विचारले होते.
दरम्यान, या जुन्या भांडणाचा राग मनात धरुन समीर याने जाधव यांची राहत्या घरासमोरील भिंतीलगक पार्क केलेली दुचाकी पेट्रोल टाकून आग लावून जाळून नुकसान केले. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करत आहेत.