अखेर अजितदादांनी रात्रीत विषय मिटवला ! पिंपरीत राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी…!


पुणे : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीने नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. याठिकाणी कोणाला उमेदवारी द्यायची याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर आता उमेदवारी जाहीर झाली आहे.

तसेच शिवसेनेचे नेते राहूल कलाटे हे देखील अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. राज्यात सध्या पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीची चर्चा सुरू आहे. सर्व पक्ष या निवडणुकीसाठी जोरदार तयारी करत आहेत.

उमेदवार जवळपास निश्चित झाले आहेत. तसेच ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी काहीजण इच्छुक आहेत. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी आवाहन केले आहे. यामध्ये त्यांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

असे असले तरी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, एकनाथ शिंदे, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी देखील कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार आहे. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असून आम्ही मविआ म्हणून ही निवडणूक लढवणार आहोत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!