Pimpri : खेळत असताना घडलं विपरीत, अंगावर गेट पडल अन् सगळं संपलं, पिंपरीत तीन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू..


Pimpri : सोसायटीचा स्लाईड गेट अंगावर पडून पिंपरीत तीन वर्षांच्या एका चिमुरडीचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ही धक्कादायक घटना पिंपरी- चिंचवडच्या बोपखेल परिसरात घडली आहे.

गिरीजा शिंदे असे या चिमुरडीचे नाव आहे.

नेमकं घडलं काय?

नेहमीप्रमाणे ही तीन वर्षांची चिमुकली आपल्या मित्रांसोबत खेळायला गेली होती. खेळताना हातात बाहुली घेऊन ती पळत सुटली. हातात बाहुली घेऊन गिरीजा खेळत असताना अचानक तिच्या अंगावर गेट पडलं. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या मुलांनी शेजारच्यांना आवाज दिला. Pimpri

त्यावेळी आजूबाजूचे लोक पळत आले आणि तिला उचलून दवाखान्यात नेण्याच्या प्रयत्न केला. मात्र त्यापूर्वीच गिरिजाचा मृत्यू झाला होता. घरातलं तीन वर्षाचं बाळ गेल्याने परिवारात शोककळा पसरली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!