पिंपरी चिंचवडच्या मतदार यादीत घोळ ; राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची नावं गायब….


पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाकडून मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.या प्रारूप मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी नगरसेवकासह 1261 मतदारांची अख्खी यादीच गायब झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तळवडे प्रभाग क्रमांक 12 मध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचं निदर्शनास आला आहे.

तळवडे प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पंकज पालेकर यांचे राहत्या घरातील यादीतून स्वतःचेच नाव शेजारच्या चिखली प्रभागात टाकले आहे. तेवढे प्रभाग 12 मधील यादी भाग सात मधील तब्बल 1261 मतदार चिखली प्रभागमध्ये वर्ग करण्यात आले आहेत. निवडणुकीच्या तोंडावर एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदारांच स्थलांतर करून निवडणूक विभाग कोणाचा फायदा करून देण्याचा प्रयत्न करत आहे असा प्रश्न नागरिकाकडून उपस्थित होत आहे.

2024च्या विधानसभेची आणि आत्ताच्या यादीतील फरक दाखवत, भालेकरांनी निवडणूक विभागाची पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आहे. मी प्रभाग 12 मधून लढण्यास इच्छुक असताना हे घडल्यानं, यामागं भाजपचा हात असल्याचा आणि निवडणूक विभागाला हाताशी धरुन हा कारभार केला गेल्याचा आरोप ही भालेकर करत आहेत. 2017च्या पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीच्या भालेकरांसह अख्ख पॅनल निवडून आलं होतं. त्यावेळी 1800 मतांनी मी निवडून आलो होतो, त्यातील 1200 मतांचं लीड कमी करण्याचा हा डाव आहे का? अशी शंका ही भालेकरांनी उपस्थित केली आहे.

प्रभागनिहाय याद्या फोडताना मोठ्या प्रमाणात चुकीची नावे, गायब झालेली नोंद व विनाकारण दुसऱ्या प्रभागात टाकलेले मतदार यामुळे नागरिक संतप्त झाले असून, राजकीय नेत्यांनीही आरोप करत याबाबत आक्षेप नोंदवले आहेत.. भाजपचे शांताराम भालेकर यांनीही प्रभागातील मोठ्या प्रमाणातील नावे वगळल्याची तक्रार केली आहे. यावर आता आयोग काय प्रतिक्रिया होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!