Pimpri- Chinchwad : पिंपरी- चिंचवडमध्ये खळबळ! एकापाठोपाठ तीन पेक्षा अधिक स्फोट, आगीमध्ये चार बस जळून खाक, परिसरात भीतीचे वातावरण…
Pimpri- Chinchwad : पिंपरी- चिंचवडमधील ताथवडे येथे जेएसपीएम विद्यालयाच्या परिसरात अचानक तीन ते चार स्कूल बसला आग लागल्याने मोठे स्फोट घडले आहेत. आग लागल्याने मोठे स्फोट होऊन हवेत आगीचे लोट उठले. त्यामुळे मोठी आग लागल्याचे समोर आलं आहे. Pimpri- Chinchwad
आगीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. ताथवडे येथील जेएसपीएम महाविद्यालया लगतच ही घटना घडली आहे. यात तीन ते चार स्कूल बस देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
जेएसपीएम महाविद्यालयाच्या परिसरात त्या विद्यालयाच्या स्कूलबस पार्क करण्यात आलेल्या आहेत. या सर्व बस गॅसवरील असून रविवारी रात्री सव्वा अकराच्या अचानक तीन ते चार बसला अचानक आग लागल्याने एकापाठोपाठ एक स्फोट झाले.
स्फोटांचा आवाज काही किलोमीटर पर्यंत ऐकायला गेला तर धुरांचे लोट आणि ज्वाला देखील दिसत होत्या. या भीषण घटनेमुळे काही क्षणातच परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी सैरावैरा रस्त्यावर धावत होते.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी अग्निशमन दलाचे जवान पोहचले असून आग विझवण्यात आली आहे. पोलिसांनी घाबरून न जाण्याच आवाहन केलं आहे. सुदैवाने या घटनेत जीवितहानी झालेली नाही. Pimpri- Chinchwad