Pimpri Chinchwad Crime : चाकणमध्ये गुन्हेगारी वाढली! शिवीगाळ केल्याच्या रागातून तरुणाचा सपासप वार करुन खून…


Pimpri Chinchwad Crime : दिवसागणिक पुण्यातली गुन्हेगारी वाढते आहे असे म्हटले तरी हरकत नाही. कोयता घेऊन रस्त्याने फिरणे, टोळा धाडी, गाड्या जाळणे एवढे च नाही तर शुल्लक रकमेसाठी हात तोडण्यासारख्या अंगावर काटा आणणारे प्रकार सध्या पुण्यात वेगात वाढले आहेत. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे.

शिवीगाळ केल्याच्या कारणावरुन चार जणांनी एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि कोयत्याने सपासप वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना चाकण परिसरात घडली आहे.

ही घटना शनिवारी (ता.१६) दुपारी साडे चार ते पाच या दरम्यान नाणेकरवाडी येथील कुशल स्वर्णाली साईटच्या कच्चा रोडजवळ घडली आहे. Pimpri Chinchwad Crime

आकाश बापु बनसोडे (वय.२५ रा.जंबुकरवस्ती, खराबवाडी, ता. खेड) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी प्रथमेश उर्फ प्रशांत बाळु फड, सम्यक दिलीप गणवीर, अभिराज मारुती कांबळे (सर्व रा. जंबुरकरवस्ती, नाणेकरवाडी, चाकण) व एका अल्पवयीन मुलावर दाखल केला आहे. याप्रकणी मृत आकाश याचा भाऊ सागर बापु बनसोडे (वय.२१) याने चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, मृत आकाश बनसोडे हा चालक आहे. त्याने क्रिकेट खेळत असताना आरोपींना शिवीगाळ केली होती. याचा राग आरोपींच्या मनात होता. शनिवारी सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपींनी शिवीगाळ केल्याच्या रागातून आकाश यांच्यासोबत वाद घातला. Pimpri Chinchwad Crime

आकाश याला कुशल स्वर्णाली साइटच्या कच्चा रस्त्याजवळ नेऊन प्रशांत फड व सम्यक गणवीर यांनी कोयत्याने वार केले. तर कांबळे व अल्पवयीन मुलाने आकाशच्या डोक्यावर, चेहऱ्यावर लाकडी दांडक्याने वार केले. आकाश जीव वाचवण्यासाठी पळाला. तो एका घरासमोर जाऊन पडला. त्यावेळी आरोपींनी त्याचा पाठलाग करुन त्याच्यावर पुन्हा कोयत्याने व लाकडी दांडक्याने सपासप वार केले.

दरम्यान, यामध्ये गंभीर जखमी होऊन फिर्य़ादी यांचा भाऊ आकाश याचा मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी पळून गेले. घटनेची माहिती मिळताच चाकण पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेचा पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!