Pimpri Chinchwad Crime : पुणे हादरले! अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर भावासह तिघांनी केला बलात्कार..
Pimpri Chinchwad Crime : शहरात महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये अलीकडे वाढ होताना दिसत आहेत. बलात्कार, विनयभंग, छेडछाड अशा दिवसाला एक ते दोन घटना दररोज घडत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंढवा येथे एका अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्या मित्र, भावासह तिघांनी बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीने तिच्या शिक्षिकेकडे कैफियत मांडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले आहे.
याप्रकणी कर्णबधीर शाळेच्या एका ५१ वर्षीय महिला शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात बुधवारी (ता.२०) फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर रजाने (वय. ३० रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (वय.२३) यांच्यासह एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, पीडित मुलगी १७ वर्षाची आहे. आरोपी सागर याने पीडित मुलगी रहात असलेल्या घरी येऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. Pimpri Chinchwad Crime
तसेच तिला माराहण करुन याबाबत कोणाला सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तर पीडित मुलीच्या अल्पवयीन भावाने ती घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेऊन तिच्या इच्छेविरोधात शारीरिक संबंध ठेवले.
तसेच पीडित मुलीचा मित्र राहुल पाटील याने तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पीडित मुलीने तिच्या सोबत घडलेला प्रकार शाळेतील शिक्षिकेला सांगितला.
त्यानंतर शिक्षिकेने मुंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तिघांविरुद्ध तक्रार दिली. या घटनेचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत.