पिंपरी चिंचवडमध्ये कोरोना रुग्ण वाढले, काळजी घेण्याचे आवाहन…!


पुणे : देशासह राज्यात सध्या कोरोना रुग्ण वाढले आहेत. यामुळे पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे.

आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये सध्या कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याचे निदर्शनास येत आहे. मंगळवारी दिवसभरात 30 बाधित रुग्ण आढळले आहेत. तर, सध्या शहरामध्ये कोरोनाचे 170 सक्रिय रुग्ण आहेत.

 

यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता लक्षणे आढळल्यास तपासणी करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. महापालिका वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभरात कोरोनाचे 30 बाधित रुग्ण आढळले आहेत.

 

तसेच 333 नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सध्या 170 सक्रिय रुग्ण असून, त्यापैकी 6 रुग्णांवर शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे. तर, अन्य रुग्णांवर गृहविलगीकरणात उपचार केले जात आहे.

 

कोरोनाने 4 एप्रिलला 89 वर्षीय ज्येष्ठाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. पाच दिवसांपूर्वी म्हणजेच 6 एप्रिलला शहरात 181 सक्रिय रुग्ण होते. त्या तुलनेत सध्या 170 सक्रिय रुग्ण असले तरी दररोज आढळणार्‍या बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!