Pimpri Chinchwad : धक्कादायक घटनेने पिंपरी चिंचवड हादरलं! अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाला नाल्यात फेकले, अन् कुत्र्यांनी…

Pimpri Chinchwad पुणे : पिंपरी-चिंचवडमधून (Pimpri Chinchwad) माणुसकीला काळिमा फासणारी घटना,समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने शहरातील बालाजीनगर परिसरात असलेल्या नाल्यात पुरुष जातीच्या एका नवजात बाळाला फेकून दिले आहे.

रस्त्यावर असलेल्या भटक्या कुत्र्यांनी या बाळाचे लचके तोडल्याने त्याचा मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेने पिंपरी चिंचवड हादरलं आहे. (Pimpri Chinchwad)
तसेच ही बाब काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या लक्षात आली. त्यांनी या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी बाळाचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढत ताब्यात घेतला.

या नवजात बाळाला नाल्यात फेकणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमआयडीसी भोसरी पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेनं परिसरातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे .