Pimpri Chinchwad : धक्कादायक! प्रियकराच्या त्रासामुळे तरुणीने उचलले टोकाचे पाऊल, घटनेने पिंपरी चिंचवड हादरलं..


Pimpri Chinchwad : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून २१ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमधून उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रियकराविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी मृत तरुणीच्या २३ वर्षाच्या बहिणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ऋषभ उर्फ पिन्या अविनाश कांबळे (रा. सिद्धार्थनगर, औंध) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, फिर्यादी यांच्या बहिणीचे आरोपी पिन्या कांबळे याच्या सोबत प्रेमसंबंध होते. मात्र त्यांच्यात वाद झाल्याने मागील एक वर्षापासून ते एकमेकांशी बोलत नव्हते. मात्र, आरोपी कांबळे याने फिर्यादी यांच्या बहिणीला सतत फोन करुन त्रास देत होता. Pimpri Chinchwad

तसेच तिला भेटून आणि राहत्या घराजवळ येवून लग्न करण्यासाठी जबरदस्ती करुन वाद घातला. तसेच तिला धमकी दिली. पिन्या कांबळे याच्याकडून होत असलेल्या त्रासाला कंटाळून फिर्यादी यांच्या बहिणीने रविवारी सकाळी साडे अकराच्या सुमारास आत्महत्या केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गावंडे करीत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!