Pimpri Chinchwad : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणीला दिला मानसिक त्रास, तरुणीचा टोकाचा निर्णय, पिंपरी चिंचवडमध्ये भयंकर घटना…
Pimpri Chinchwad : उसने दिलेले पैसे परत मागितल्याने तरुणीला मानसिक त्रास दिल्याने त्याच्या त्रासाला कंटाळून तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
पायल मच्छिंद्र कोकाटे (वय. १९) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याबाबत तिची आई नंदा मच्छिंद्र कोकाटे (वय. ४८, रा. बोतार्डे, ता. जुन्नर) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी राम कोकाणे (रा. अजनावळे, ता. जुन्नर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मोशीमधील आदर्शनगर येथे ३१ जुलै रोजी घडली आहे.
सविस्तर माहिती अशी की, पायल ही शिक्षणासाठी मोशीतील आदर्शनगर येथे रुम घेऊन रहात होती. तिने राम कोकणे याला उसने पैसे दिले होते. ते पैसे पायल त्याला परत मागत होती. Pimpri Chinchwad
पैसे देण्यास तो टाळाटाळ करुन तिला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून तिने रुममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस उपनिरीक्षक खताळ अधिक तपास करीत आहेत.