Pimpari Cinchawad : पिंपरी चिंचवडच्या सैनिक अकॅडमीचे ४ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू ; सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुर्दैवी घटना ..!


Pimpari Cinchawad सिंधुदुर्ग : देवगड समुद्रकिना-यावर शनिवारी (दि. ९) दुपारी ४ वाजता मोठी दुर्घटना घडली आहे. पर्यटनासाठी आलेले पाच पर्यटक बुडाले असून यामधील चौघांचे मृतदेह मिळाले असून एक जण बेपत्ता आहे. हे सर्व पर्यटक पुणे येथील खासगी सैनिक अकॅडमीचे विद्यार्थी असल्याने सैनिक अकॅडमीना मोठा धक्कासा बसला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये चार मुलींचा समावेश आहे, तर एक मुलगा बेपत्ता आहे.

मिळालेल्या माहिती नुसार पिंपरी -चिंचवड येथील सैनिक अकॅडमीची ३५ जणांची सहल देवगड येथे आली होती. समुद्रातआंघोळीसाठी पाच जण उतरले होते. समुद्रात उतरल्यानंतर त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुले ते सर्व ५ जण समुद्रात बुडाले. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर बेपत्ता आहे.

सर्व मृतदेह देवगड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. मृतांमध्ये प्रेरणा डोंगरे, अंकिता गालटे, अनिशा पडवळ, पायल बनसोडे यांचा समावेश आहे. तर राम डिचोलकर अजूनही बेपत्ता असून पोलिस स्थानिकांच्या मदतीने शोध घेत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!