अंधश्रद्धेतून अघोरी कृत्य ! मुक्या सहा डुकरांना क्रुरपणे जाळले ;पिंपरी येथील घटनेनंतर दोघांवर गुन्हा दाखल


पुणे : पिंपरी चिंचवड येथील संत तुकराम नगर येथील एच.ए. ग्राऊंड या मैदानात क्रुरपणे दोघांनी सहा डुकरांना जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उडकीस आला आहे. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.


या प्रकरणी वकील प्रज्वल कमलेश दुबे (वय 29, रा.तुकाराम मगर, पिपंरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सुनिल गजरे (वय 23), बबन गजरे (वय 19) रामदास गजरे (वय 40) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दुबे कामानिमित्त जात असताना त्यांना काही जण गाडीमधून डुकरांना खाली उतरवताना दिसले. संशय आल्याने फिर्यादी यांनी त्वरीत महापालिका पशुवैद्यकीय विभागाला फोन केला. घटनेची माहिती देत, याबाबत काही परवाना महापालिकेने दिला आहे का? याची विचारणा केली. यावेळी त्वरीत महापालिकेने आरोग्य निरीक्षकाला तेथे पाठवले.
फिर्यादी यांनी दरम्यान काही प्राणी मित्रांना तेथे बोलावले. जवळ जाताना त्यांना एक जिवंत डुक्कर दिसले पुढे काही
अंतरावर सहा डुकारांना जाळून टाकण्यात आल्याचे धक्कादायक दृश्य फिर्यादी व प्राणी मित्रांना दिसले. यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली. तेथील दृश्य पाहता अंधश्रद्धेतून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. पिंपरी पोलीस याचा पुढील तपास करत आहेत
