Pune Lok Sabha : कॉग्रेस नेत्याचा फ्लेक्सवर फोटो नाही, कार्यकर्त्यांनकडून मंडपवाल्याला मारहाण..!!

पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीसाठी फ्लेक्स लावले होते. पण या फ्लेक्सवर एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो टाकला नाही, त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी थेट मंडपवाल्याला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

मेळावा सुरू होण्यापूर्वीच हा सर्व प्रकार घडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, कालच केसरीवाडा येथे काँग्रेसमधील अंतर्गत वाद समोर आले होते.
अशातच आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील नाराजी काही संपत नसल्याचं पाहायला मिळत आहे. याचा परिणाम आगामी लोकसभा निवडणूकीवर देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Views:
[jp_post_view]