फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरकर्त्यांनो लक्ष द्या! आज पासून होणार नवीन नियम लागू…

पुणे : यूपीआय वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज पासून म्हणजेच एक ऑगस्ट २०२५ पासून यूपीआय संदर्भातील काही नियमांमध्ये बदल होणार आहेत. एनपीसीआयने यूपीआयच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयानुसार आता यूपीआय वापरकर्त्यांना दिवसातून फक्त ५० वेळा बँक बॅलन्स म्हणजे खात्यातील रक्कम तपासता येणे शक्य होणार आहे. यापेक्षा जास्त वेळा खात्यातील रक्कम तपासता येणार नाही.
याव्यतिरिक्त यूपीआय वापरकर्त्यांना त्यांच्या मोबाईल नंबरशी लिंक असणारे बँक अकाउंट सुद्धा दिवसांतून फक्त २५ वेळा पाहता येणार आहेत. यूपीआयच्या नियमांमध्ये करण्यात आलेला हा बदल सिस्टम वरील अनावश्यक ट्रॅफिक कमी करण्याच्या अनुषंगाने लागू करण्यात येणार आहे.
दरम्यान, एनपीसीआयच्या मते बँक बॅलन्स चेक करणे तसेच बँक अकाउंट चेक करण्यासारख्या सेवांमुळे सेवेचा वेग मंदावतो आणि आउटेज होण्यासारख्या गोष्टी घडत असतात. याच कारणांमुळे एनपीएससीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.
याचा युपीआय वापरकर्त्यांवर फारसा परिणाम होणार नाही. कारण की आपल्यापैकी फारच कमी जण एका दिवसात ५० वेळा बँक बॅलन्स चेक करत असते. आणि एका दिवसात २५ वेळा बँक अकाउंट पाहणाऱ्यांची संख्या देखील बोटावर मोजण्या इतकी असेल. त्यामुळे या बदललेल्या नियमांमुळे ग्राहकांवर फारसा काही परिणाम होणार नाही. कारण की यूपीआय द्वारे ग्राहकांना आधी प्रमाणे पेमेंट करता येणार आहे.