कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा! पीएफ काढणे होणार सोपे; EPFO चे खास मोबाईल ॲप लवकरच उपलब्ध…


पुणे : भारतामधील कोट्यवधी कर्मचारी ईपीएफओशी जोडलेले असून त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ईपीएफओ लवकरच एक नवीन मोबाईल अ‍ॅप लॉन्च करण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे कर्मचारी आपल्या पीएफ खात्यातील पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी आणि जलद करू शकतील.

सध्या पीएफ पैसे काढण्यासाठी वेळखाऊ प्रक्रिया पार करावी लागते, परंतु नवीन अ‍ॅपमुळे हा त्रास कमी होण्याची शक्यता आहे. या अ‍ॅपमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल आणि यामुळे पीएफचे पैसे थेट बँक खात्यात ट्रान्सफर करता येणार आहेत.

याशिवाय, अ‍ॅपमध्ये Unified Payments Interface (UPI) चा वापर करून काही मिनिटांतच पैसे खात्यात मिळण्याची सुविधा उपलब्ध होईल. या नव्या सुविधेमुळे कर्मचारी त्यांच्या पीएफ रकमेस अधिक वेगवान आणि सोप्या पद्धतीने मिळवू शकतील.

ईपीएफओचे नवीन मोबाईल अ‍ॅप पूर्णपणे डिजिटल आणि युजर‑फ्रेंडली बनवण्यावर भर देण्यात आला आहे. हे अ‍ॅप थेट वापरकर्त्याच्या बँक खात्याशी जोडले जाईल आणि BHIM सारख्या इतर यूपीआय अ‍ॅप्ससोबतही इंटीग्रेट केले जाणार आहे. यामुळे पीएफमधील रक्कम प्रथम बँकेत ट्रान्सफर करून नंतर सहज काढता येईल.

सध्या पीएफ काढण्यासाठी फक्त ऑनलाइन पोर्टलचा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामध्ये अनेक वेळा जास्त वेळ लागू होतो आणि काही तांत्रिक अडचणीही येतात. मात्र नवीन अ‍ॅपमुळे ही संपूर्ण प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण होऊ शकते. त्यामुळे देशातील कोट्यवधी कर्मचाऱ्यांना या सुविधेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

नवीन सुविधेनुसार, ईपीएफओ सदस्य आपल्या पीएफ बॅलन्समधून जास्तीत जास्त ७५% रक्कम काढू शकतील, तर किमान २५% रक्कम खात्यात ठेवणे बंधनकारक राहील. यामुळे एकाच वेळी संपूर्ण रक्कम काढणे शक्य होणार नाही.

जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी गेली, तर उर्वरित २५% रक्कम १२ महिन्यांनंतर काढण्याची परवानगी दिली जाईल. अधिकाऱ्यांच्या मते, हा नियम पीएफ फंड सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक आहे. सध्या ईपीएफओकडे सुमारे २६ लाख कोटी रुपयांचा फंड असून त्यात कोट्यवधी लोकांची बचत जमा आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!