हडपसरमध्ये पेट्रोल चोरीचे रॅकेट उघड, 2 कोटींचा माल जप्त, चौघे अटकेत…!


पुणे : पुण्यात पेट्रोल चोरीचे मोठे रॅकेट समोर आले आहे. याबाबत विमानासाठी लागणारे शुद्ध पेट्रोल घेऊन जाणारे टँकर आडबाजूला उभे करतात. वॉल बॉक्समध्ये असलेल्या फटीचा गैरफायदा घेऊन त्यात पट्टी टाकतात.

त्याबरोबर खालच्या बाजूला पेट्रोलची धार लागते. हे पेट्रोल ट्रेमध्ये गोळा करुन कॅनमध्ये भरले जाते. त्यानंतर ते काळ्या बाजारात विकले जाते. टँकरमधील पेट्रोल चोरीचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि हडपसर पोलिसांनी पर्दाफाश केला.

टँकरमधील काढलेले १४ प्लॅस्टिक  कॅन पेट्रोलसह २ कोटी २८ लाखांचा माल जप्त केला असून चौघांना अटक केली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. वाशी येथून शिर्डी येथील विमानतळावर विमानांसाठी पेट्रोल घेऊन टँकर निघाले होते.

हे टँकर कंपनीकडून मार्ग निश्चित केला असतानाही हडपसरजवळील १५ नंबरमधील लक्ष्मी कॉलनीत थांबले असून त्यातून पेट्रोल काढले जात असल्याची माहिती पोलीस अंमलदार मनोज सुरवसे यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी येथे छापा टाकला.

यामध्ये सुनिल कुमार प्राणनाथ यादव, दाजीराम लक्ष्मण काळेल, सचिन रामदास तांबे, शास्त्री कबलु, सरोज अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस कसून चौकशी करत आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!