Petrol Diesel Price : आता बोला! कर्णाटकात काँगेस राज्य सरकारचा जनतेला दणका! पेट्रोल, डिझेलमध्ये केली तीन रुपयांनी वाढ …

Petrol Diesel Price : लोकसभा निवडूक संपताच कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली आहे. सरकारे आज पासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. पेट्रोलियम डिलर्स असोसिएशन नुसार, पेट्रोल आणि डिझेलचे दर कर्नाटकमध्ये वाढवले गेले आहेत.
पेट्रोल-डिझलेच्या किमतीत अनुक्रमे ३ रूपये आणि ३.०२ रूपयांची वाढ होईल, कारण राज्य सरकारने सेल टॅक्समध्ये बदल केला आहे. तर देशातील इतर राज्यात पेट्रोल आणि डिझलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. नवी दिल्लीत आज पेट्रोलचा दर ९४.७२ रुपये प्रति लीटर आहे. Petrol Diesel Price
शनिवारी राज्य सरकारच्या अधिसूचनेनुसार, पेट्रोलवर कर्नाटक विक्री कर २५.९२ टक्केवरून वाढवून २९.८४ टक्के आणि डिझेलवर १४.३ टक्केवरून वाढवून १८.४ टक्के केला आहे. कर्नाटक पेट्रोलियम डीलर्स असोसिएशन नुसार, पेट्रोलचा दर ३ रुपयांनी वाढून १०२.८५ रुपये प्रति लीटर होईल, तर डिझेलचा दर ३.०२ रुपयांनी वाढून ८८.९३ रुपये प्रति लीटर होईल. हा आदेश तात्काळ लागू केला जाईल.
देशातील इतर शहरांतील पेट्रोल-डिझेलचे प्रति लीटर अनुक्रमे दर पुढील प्रमाणे..
मुंबई – १०४.२१ रुपये, ९२.१५ रुपये, कोलकाता – १०३.९४ रुपये, ९०.७६ रुपये, चेन्नई – १००.७५ रुपये, ९२.३४ रुपये.