व्यक्तिमत्त्व विकास तज्ञ वंदन नगरकर यांचे अकाली निधन…!

पुणे : व्यक्तिमत्त्व विकास तज्ज्ञ वंदन नगरकर यांचे अकाली निधन झाले. ते कॉर्पोरेट ट्रेनर होते. ते ६१ वर्षांचे होते. ते विनोदी अभिनेते, नाटककार, लेखक राम नगरकर यांचे चिरंजीव होत. राष्ट्रसेवा दल, राम नगरकर कला अकादमी अशा संस्थांशी ते संबंधित होते. राम नगरकर यांच्या निधनानंतर वंदन नगरकर यांच्यातील कलागुण ओळखून ख्यातनाम अभिनेते निळू फुले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे वंदन नगरकर यांनी ‘रामनगरी’ ला पुन्हा रंगभूमीवर आणले.
ते कॉर्पोरेट ट्रेनर होते. ते गेली अनेक वर्ष याच क्षेत्रात पूर्णवेळ कार्यरत होते. ते राष्ट्रीय प्रशिक्षक असून त्यांनी विद्यार्थापासून अधिकाऱ्यां पर्यंत सर्वांसाठी दोन हजार कार्यशाळा घेतल्या.
Views:
[jp_post_view]