स्वत:च्या समाजाचे लोक धनंजय मुंडेंना चप्पलने मारतील! करूणा मुंडेंचा मोठा गौप्यस्फोट, नेमकं काय म्हणाल्या?


बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यासमोरील जुने प्रकरण पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. करूणा मुंडे यांनी त्यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात त्यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचीही भेट घेतल्याचा गौप्यस्फोट केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

करूणा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधताना थेट त्यांच्या चारित्र्यावर हल्ला केला आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्या बहिणीवर बलात्कार केला, असा खळबजनक दावा त्यांनी केला. इतकेच नाही, तर आपल्या आईने आत्महत्या केली असून, त्यासंबंधीची सुसाईड नोट आणि इतर सबळ पुरावे आपल्याकडे असल्याचा दावाही करूणा यांनी केला आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी ‘गुंडा गँग’ पाळली असल्याचा आरोपही त्यांनी केला. करूणा मुंडे यांनी मुंडेंना थेट आव्हान देत म्हटले, माझं धनंजय मुंडेला चॅलेंज आहे, मी अंगावर येते मला शिंगावर घे. तुला जीआर कळतो, पण शपथपत्र कळतं का? असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

       

करूणा मुंडे यांनी सांगितले की, हे सर्व पुरावे घेऊन त्या मनोज जरांगे पाटील यांना भेटल्या होत्या. जरांगे पाटलांनी त्यांना समजावून सांगितले. अजून धनंजय मुंडे यांचे काहीच बाहेर काढलेले नाही. जर सर्व बाहेर काढले, तर त्यांचे महाराष्ट्रात राहणे मुश्किल होईल आणि स्वतःच्या समाजाचे लोक त्यांना चपलेने मारतील, असे जरांगे पाटील म्हटल्याचा दावा करूणा मुंडेंनी केला.

दरम्यान, हे प्रकरण २०२१ सालीसुद्धा चर्चेत आले होते. करूणा मुंडे यांची बहीण रेणू शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यांनी १९९६ पासून ओळखत असल्याचे आणि २००६ पासून मुंडे यांनी वारंwar बलात्कार केल्याचे म्हटले होते.

२००६ मध्ये करूणा मुंडे बाळंतपणासाठी इंदूरला गेल्या असताना, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मुंडेंनी हे कृत्य केल्याचा आरोप रेणू यांनी केला होता. त्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती, मात्र नंतर ती मागे घेण्यात आली होती.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!