घोडगंगा कारखान्यात रखडलेले पगार लोकवर्गणीतून होणार, वीज पुरवठाही बंद…

शिरूर : गेल्या काही दिवसांपासून शिरूर तालुक्यातील न्हावरे येथील रावसाहेबदादा पवार घोडगंगा साखर कारखाना दोन हंगाम बंद आहे. आता कारखान्याचा वीज पुरवठा महावितरणने नुकताच खंडित केला आहे. यामुळे कारखान्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

आता कारखान्याच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आता सुरक्षा रक्षक कामगारांचे रखडलेले पगार आता कारखाना सुरू होईपर्यंत कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक, सभासद व कारखान्याचे हितचिंतक यांच्या लोकवर्गणीतून गोळा करून देण्यात येणार आहेत. यामुळे सुरक्षेचा प्रश्न सुटणार आहे.
याबाबत न्हावरे (ता. शिरूर) येथील राजमुद्रा हॉटेल येथे काल घोडगंगा कारखाना आता आहे, त्या स्थितीत ठेवण्यासाठी तालुक्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष व संचालक दादा पाटील फराटे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष रविंद्र काळे, भाजपचे तालुका अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य राहुल पाचर्णे आदी उपस्थित होते.

याबाबत कारखाना परिसरात वीज नसल्यामुळे कारखान्याच्या मोठ्या किंमतीच्या आठ मोटर्स, ऊस वाहतूक करणाऱ्या टायर बैलगाडीच्या विविध साहित्यांची चोरी झाली आहे. यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. कारखाना बंद असल्याने याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
तसेच कारखान्याच्या सुरक्षा रक्षकांचा पगार बंद झाल्यामुळे संबंधित सुरक्षा रक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. काही सुरक्षा रक्षक काम सोडून निघूनही गेले आहेत. सद्य स्थितीमध्ये केवळ तीनच सुरक्षा रक्षक कारखान्याचे दिवस-रात्र संरक्षण करत आहेत. मात्र आता त्यांचे पगार लोकवर्गणीतून होणार आहेत.
दरम्यान, वीज बील थकल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर सध्या रात्री अंधारामुळे भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आता अनेकजण पुढे होऊन याबाबत मागणी करत आहेत.