पवारांच्या संकटमोचक सोनिया दुहान मुंबईत दाखल; म्हणाल्या, ‘थोडं थांबा साहेब..


मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान या मुंबईत दाखल झालेल्या आहेत. २०१९मध्ये अजित पवारांसोबत गेलेले आमदार परत आणण्यासाठी सोनियांवर पवारांनी जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे अजित पवारांचं बंड मोडून काढण्यास मदत झाली. त्याच सोनिया दुहान मुंबईत दाखल झालेल्या आहेत.

सोनिया दुहान या युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तर त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्याही आहेत. ५ मे रोजी शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन दिलेला राजीनामा मागे घेतला होता. तेव्हा पत्रकार परिषदेत त्या शरद पवारांच्या मागे बसल्या होत्या. त्यामुळे त्यांची महाराष्ट्रात चर्चा झाली होती.

तसेच आज सोनिया यांनी मुंबई दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, पवार साहेब चेकमेटसाठी प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवा दुपारनंतर समजेल काय परिस्थिती आहे.

मी पैलवानांच्या भागातून येते त्यामुळे मला माहिती आहे की चितपट कसं करायच? ते आम्ही करूच जर त्यांच्याकडे ४४ आमदार आहेत तर वाट कसली बघत आहेत. आम्ही ९ आमदारांविरोधात निवडणूक आयोगाकडे पत्र दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे चार आमदार गायब होते. हे आमदार म्हणजे – दौलत दरोडा, नरहरी झिरवळ, नितीन पवार आणि अनिल पाटील.

नाट्यमय पद्धतीने भाजपाच्या गळाला लागलेल्या या आमदारांना परत आणण्याचे काम या २८ वर्षीय तरुणीने केल्याचं म्हटलं जातं. गुरुग्राममधल्या एका हॉटेलमधून सोनियांनी या आमदारांना परत आणले होते.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!