पुण्यात पवारांचा मोठा डाव ; झेडपीसाठी घड्याळाचा गजर वाजणार, तुतारीचा आवाज बसणार!


पुणे: महापालिका निवडणुकीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. या निवडणुकीसाठी पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचं स्पष्ट झाल्यानंतर एकाच चिन्हावर दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच समोर आलं आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या राजकीय आखाड्यात जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटाला घड्याळा’च्या चिन्हाखाली एकत्र आणण्यात यश मिळवले असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे शरद पवार यांच्या गटाची ‘तुतारी’ शांत होणार असून, सर्व उमेदवार अजित पवार यांच्या ‘घड्याळ’ चिन्हावरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अशातच आता शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनीही आगामी निवडणुकीत ‘घड्याळ’ चिन्हावरच लढण्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षात तसे एकमत झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह प्रचारातून गायब होणार आहे.

पुण्यातील जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादीचे सत्ता मिळवण्यासाठी दोन्ही गट एकत्र झाले आहेत.महापालिका निवडणुकीतील अनुभवानंतर, सत्तेसाठी आणि विजयासाठी दोन्ही गटांनी एकाच चिन्हाखाली निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जात आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!