Nashik : रस्त्यावर आल्याशिवाय केंद्र सरकारला कळत नाही, पवारांचा सरकारवर हल्लाबोल ..


नाशिक : केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतक-यांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. आता राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार कांदा उत्पादक शेतक-यांसाठीमैदानात उतरले आहेत.

तसेच सरकारच्या धोरणामुळे शेतकर-यांच्या कष्टाला किंमत मिळत नसून, कांदा निर्यात बंदी करून शेतक-यांची चेष्टा करण्यात येत असल्याचे पवारांनी म्हटले आहे. त्यामुळे कांदा निर्यात बंदी उठलीच पाहिजे. पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, अशी टीका शरद पवार यांनी केली आहे.

आज सोमवार (ता.११) पवारांच्या उपस्थितीत नाशिकच्या चांदवडमध्ये रास्तारोको आणि सभा होत आहे. याच सभेतून पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी अनेक शेतकरी उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही . आम्हाला रस्त्यावर येण्याची हौस नाही, पण, रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. तसेच कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची चेष्टा करण्यात येत असल्याचेही पवारांनी म्हटले आहे.

पूढे पवार म्हणाले की, तुम्ही सगळे कष्ट करतायत, पण सरकारच्या धोरणामुळे शेतक-यांच्या कष्टाला किंमत मिळत नाही. ज्यांच्या हातात धोरणे ठरविण्याचे अधिकार आहेत, त्यांना जाणे नसेल तर शेतकरी उध्वस्त होण्यास वेळ लागणार नाही. मी मागे मनमाडला आलो होतो, तेव्हा मला काही शेतक-यांनी सांगितले की, कांदा संदर्भात काही निर्णय केंद्र सरकार घेत आहे.

त्यामुळे मी कार्यक्रम थांबवून तत्काळ दिल्लीला गेलो.जेवणात व इत्यादी गोष्टीत कांदा वापरला जात असून हे सरकारला का काळात नाही. शेतकऱ्यांना पण भाव वाढ मिळालीच पाहिजे. त्यांचे कष्ट ह्या सरकारला का दिसत नाहीये. सरकार नाही तिथे भाव वाढवतात तसेच शेतकऱ्यांचा भाव का नाही वाढवत. असा अन्याय शेतकऱ्यावर का ? सरकार शेतकऱ्याचा काही विचार करणार आहे कि नाही.

त्यावेळी, भाजपचे लोकं कांद्याच्या माळ गळ्यात घालून आले होते. याबाबत अध्यक्षांना विचारल्यावर कांद्याचे भाव खूप वाढल्याचे त्यांनी सांगितले. तसेच कांद्याचे दर कमी करता येणार नाही का? असे मला अध्यक्षांनी विचारले. त्यावर, दोन पैसे शेतक-यांना मिळत असतील तर मिळू द्या असे मी त्यांना सांगितले, असल्याच पवार म्हणाले.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!