पवार कुटुंब एकत्र येऊ लागलंय? काल दादांशी भेट, आज सुनेत्रा पवारांशी चर्चा, चर्चांना उधाण…

बारामती : राजकारणात सध्या मोठे कुटुंब असलेले पवार कुटुंब एकत्र येईल अशी चर्चा सध्या सुरू आहे. काल पुण्याच्या साखर संघाच्या बैठकीत खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात संयुक्त बैठक झाली. महिन्याभरात ही चौथी बैठक ठरली आहे. याबाबत चर्चा सुरू झाले आहेत.
आज विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीच्या निमित्ताने शरद पवार आणि राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आणि युवा नेते युगेंद्र पवार पुन्हा बारामतीत एकत्र आले आहेत. त्यामुळे पवार कुटुंबीयांच्या एकत्र येण्याचे देखील संकेत मिळत आहेत. यामुळे आगामी काळात याबाबत काय घडेल हे लवकरच समजेल.
आज बारामतीत युगेंद्र पवार यांनी कांकीची बैठकीपूर्वी भेट घेत त्यांच्या पाया पडले. त्यानंतर बैठकीतही दोघेही शेजारी बसले होते त्यांच्या सोबत शरद पवार हेही या बैठकीत उपस्थित होते. यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीत मनोमिलन होणार का? याची शक्यता नाकारता येत नाही.
काल शरद पवार यांची पुतण्या अजित पवार यांच्यासोबत एकत्रित बैठक झाली. आता अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी त्यांचा पुतण्या युगेंद्र पवार यांच्यासोबत शरद पवार सहभागी झालेल्या बैठकतीत उपस्थिती दर्शवली. त्यामुळे पवार कुटुंबियांच्या चर्चेला उधाण आले आहे. याबाबत एकत्र आलो तर आनंद होईल असे सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनी म्हटले आहे.
रोहित पवार यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मनोमिलनाच्या केलेल्या इशाऱ्यावर एक्स पोस्ट टाकली होती. ती पोस्टही चर्चेचा विषय ठरत आहे. राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाची जोरदार चर्चा सुरू आहे. यामुळे सध्या राजकारणात मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत.