ब्रेकिंग! बस दरीत कोसळून २७ प्रवाशांचा मृत्यू, २१ जण जखमी…


मेक्सिको : मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीजवळ एक भीषण अपघात झाला झाल्याची माहिती समोर आली आहे. योसोंडुआकडे जाणारी एक बस दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.

तसेच हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातामध्ये २७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २१ जण गंभीर जखमी झाले.

यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत पावलेल्या लोकांमध्ये एका लहान बाळाचा देखील समावेश होता, गुरुवार (ता.६) सकाळी ६.३० च्या दरम्यान हा अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याचे बोलले जात आहे.

या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामध्ये २५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर, २१ जण गंभीर जखमी झाले. सध्या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!