प्रवाशांना फटका ; पुण्यात विमान तिकिटांची दुप्पट -तिप्पट वाढ ; किती आहेत दर?

पुणे : सलग सुट्ट्या आल्यामुळे पुण्यातील विमान तिकीटाचे दर दुप्पटीने आणि तिप्पटीने वाढले आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे.शुक्रवारी १५ ऑगस्टची शासकीय सुट्टी आहे. तर १६ आणि १७ ऑगस्टच्या विकेंडमुळे सलग तीन दिवस सुट्टी मिळत आहे. या सुट्टीचा फायदा घेत अनेक जणांनी बाहेर जाण्याचा प्लॅन आखला आहे. अशातच आता विमान प्रवास महागला असल्याने प्रवाशांना याचा मोठा फटका बसणार आहे.

पुण्याहून गोव्याला जाण्यासाठी ११ हजार रुपये तर चेन्नईला जाण्यासाठी एका विमान कंपनीने ५० हजार रुपये तिकीट दर आकारले आहेत. फिरायला जाणाऱ्यांची गर्दी देखील वाढली असली तरी देखील पर्यटकांनी तिकीट दर वाढवल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.सलग सुट्टीच्या काळात प्रवाशांची संख्या अधिक आहे मात्र विमानांची संख्या मर्यादित असल्याने विमान कंपन्यांना ही दरवाढ करावी लागत असल्याचे सांगितले जात आहे.

विमान तिकाटांचे दर किती?

पुणे ते गोवा – ११ हजार
पुणे ते दिल्ली – १६ हजार
पुणे ते कोलकत्ता – ९ हजार
पुणे ते बंगळूरू – १५ हजार
पुणे ते हैदराबाद – १२ हजार
पुणे ते चेन्नई – ५० हजार
पुणे ते कोची – १० हजार
