Parth Pawar : नरेश अरोरांवरील वक्तव्य अमोल मिटकरी यांना भोवलं! पार्थ पवारांनीच दिली तंबी, नेमकं प्रकरण काय?

Parth Pawar : माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे रणनीतीकार नरेश अरोरा यांनी दोन दिवसापूर्वी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला. यावर पक्षाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत डिझाईन बॉक्स या कंपनीने पैसे घेऊन काम केले सगळ्या करिष्मा अजित पवारांचा आहे असे वक्तव्य केले.
अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत झाली कशी असावा नाही अमोल मिटकरी यांनी केला होता मात्र त्यानंतर थेट पार्थ पवारांनीच अमोल मिटकरींना तंबी देत मीडियामध्ये बाईट न देण्याची सूचना केली आहे.
लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलेली मरगळ व नैराश्य झटकण्यासाठी डिझाईन बॉक्स या नरेश अरोराच्या कंपनीला राजकीय रणनीतीचे काम दिले होते.
त्यानुसार गुलाबी संकल्पना घेत लाडक्या बहिणी योजनेची प्रचंड जाहिरात बाजी करण्यात आली त्याचे सर्व नियोजन व संकल्पना नरेश अरोरा यांच्या या कंपनीकडे होते साहजिकच अजित पवारांना या निवडणुकीत मोठा फायदा झाला आणि त्यांच्या ४१ जागा निवडून आल्या आहे. Parth Pawar
तसेच दोन दिवसापूर्वी नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवून छायाचित्र काढले. त्यावरून अमोल मिटकरी चांगलेच भडकले. एकनाथ शिंदे यांच्याकडेही तीन कंपन्या होत्या, परंतु त्यांच्या खांद्यावर हात ठेवण्याची कोणाची हिम्मत झाली नाही. तुम्ही काम करता, म्हणजे पैसे घेता. निवडणुकीतील विजय हा अजित पवारांच्या लोक नेतृत्वाचा करिष्मा आहे असे सांगत त्यांनी नरेश अरोरांना झापले.
दरम्यान, मात्र त्याची दखल पार्थ पवारांनी गांभीर्याने घेतली आणि पार्थ पवारांनी माझे वडील किंवा माझा पक्ष मिटकरी यांच्या या वक्तव्यास अजिबात समर्थन करत नाही, तसेच मिटकरी यांनी देखील या पुढील काळात या विषयावर बाईट देऊ नये अशा स्वरूपाची त्यांनी तंबी दिली आहे.