Parliament Winter Session : २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार संसदेचे हिवाळी अधिवेशन, हे मुद्दे गाजणार..

Parliament Winter Session : आत्ताच एक महत्वाची राजकीय बातमी समोर आली आहे. लोकसभेचे १८ वे हिवाळी अधिवेशन २५ नोव्हेंबरपासून सुरू होणार असून ते २० डिसेंबरपर्यंत चालणार आहे. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त संयुक्त अधिवेशन होणार आहे.
संसदेचे हिवाळी अधिवेशन सोमवार २५ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. भारत सरकारच्या शिफारशीनुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांना बोलावण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी एक्स पोस्ट करत आज (ता.५) दिली आहे. Parliament Winter Session
संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा, राज्यसभा या दोन्ही सभागृहाचे कामकाज शुक्रवार २० डिसेंबर २०२४ पर्यंत चालेल. दरम्यान २६ नोव्हेंबर रोजी संविधान स्वीकारल्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त साजरा केला जाणारा संविधान दिनाचा कार्यक्रम संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरा केला जाईल, असे देखील ट्विट संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी म्हटले आहे.
दोन मुद्द्यांवरून विरोधाक सरकारला घेणार..
वन नेशन-वन इलेक्शन आणि वक्फ विधेयक हे दोन मुद्दे अतिशय गाजण्याची शक्यता आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विरोधाक या दोन मुद्यांवर सरकारची कोंडी करण्याची रणनीती आखत आहेत. या दोन्ही मुद्यांवरून बराच गदारोळ होण्याची शक्यता आहे.
वन नेशन-वन इलेक्शनच्या रिपोर्टला आधी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळेल आणि त्यानंतर हिवाळी अधिवेशनात यासंबंधीचे विधेयक मांडले जाईल. विरोधी पक्षाकडून या विधेयकाला आधीपासून विरोध केला जात आहे. तसेच विरोधक देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या निर्णयाच्या देखील विरोधात आहेत. अशा स्थितीत हे विधेयक मंजूर करणं सरकारसाठी कठीण होणार आहे.
दरम्यान, वक्फ विधेयक २०२४ वर सुरू असलेला वाद देखील संसदेच्या अधिवेशनात मुद्दा बनू शकतो. खरे तर वक्फ विधेयकावर गठित जेपीसी आपला अहवाल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मांडू शकते. यावरून विरोधी पक्ष सरकारला विरोध करत आहेत. जेपीसीच्या बैठकीत वक्फ विधेयकाबाबत अनेकदा गदारोळ झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार २६ नोव्हेंबर रोजी जुन्या संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये संसदेचे संयुक्त अधिवेशन होणार आहे.