Parliament Security Breach : संसद घुसखोरी प्रकरणाला वेगळे वळण, आता खरा मास्टरमाइंड पोलिसांच्या ताब्यात…
Parliament Security Breach : संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड समजल्या जाणाऱ्या ललित झा याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ललित झा याने आपल्या एका साथीदारासह आत्मसमर्पण केले आहे.
दोघेही गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील ड्युटी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. एका अधिकाऱ्याने सांगितले की, आत्मसमर्पण केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि विशेष कक्षाच्या ताब्यात दिले.
चार आरोपींनी संसदेत घुसखोरी केल्यानंतर ललित झा याने या घटनेचा व्हिडिओ त्याच्या एनजीओ पार्टनरला पाठवला होता, अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास स्पेशल सेल करत आहे. याप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
बुधवारीच पाच जणांना अटक करण्यात आली होती. या घटनेनंतर ललित झा राजस्थानमधील नागौरला बसने गेले होते, असा दावा पोलिसांनी केला आहे. तेथे त्यांनी एका हॉटेलमध्ये रात्र काढली. गोंधळाच्या वेळी ललित झा संसदेच्या बाहेर उपस्थित होता, असे सांगण्यात येत आहे. Parliament Security Breach
ललित संसदेत घडलेल्या घटनेनंतर राजस्थानला गेला. राजस्थानला गेल्यानंतर तिथे आपल्या सहकाऱ्यांना भेटला आणि हॉटेलमध्ये राहिला. त्यानंतर पोलीस शोधत असल्याचे त्याला कळाले त्यानंतर ललित बसने दिल्लीला आला आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले.
गुरूग्राममध्ये ललित झा याने एक महत्त्वाची बैठक घेत हा कट आखला होता, असं पोलीस तपासात आली आहे. लोकसभेत मनोरंजन आणि सागर शर्माने घुसखोरी केली तेव्हा प्रेक्षक गॅलरीतून या प्रकाराचं शुटींग ललितनेच केलं आणि सोशल मीडियावर अपलोड केले. तसेच, ललित झासोबत चौघेही आरोपी संपर्कात होते.
घटना होण्याआधी त्याने चौघांचे फोन ताब्यात घेतले आणि तो फरार झाला, असे पोलिसांनी म्हंटले आहे. ललित झाचे शेवटचे लोकेशन नीमरानाजवळ आढळलंय. ललित झाचा संबंध असलेल्या एका एनजीओचीही चौकशी केली जात आहे. या एनजीओला येणारा निधी कुठून येतो याचा तपास सुरू आहे.