अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार जाहीर, 13 खासदारांची झाली निवड…!
नवी दिल्ली : केंद्रातील संसदरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी बाजी मारली आहे. संसदेतील त्यांच्या भाषणाची सातत्याने चर्चा होत असते. कामांचा पाठपुरावा आणि आक्रमक शैली यामुळे ते चर्चेत असतात.
महाराष्ट्रातील भाजपचे गोपाळ शेट्टी, राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. अमोल कोल्हे, भाजपच्या हिना गावित, राज्यसभेतील राष्ट्रवादीच्या खासदार फौजिया खान यांना संसदरत्न पुरस्कार झाला आहे. या खासदारांनी संसदेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये 13 खासदार, दोन संसदीय समितीचे सदस्य आणि एक जीवनगौरव पुरस्कार विजेत्यांचा समावेश आहे. तसेच राज्यसभा खासदारांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डॉ. जॉन ब्रिट्स, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौजिया खान, समाजवादी पक्षाचे विशंभर प्रसाद निषाद आणि काँग्रेसच्या छाया वर्मा यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी संसदरत्न पुरस्कार सुरू केले होते. डॉ. अब्दुल कलाम यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार दिला जातो. ही परंपरा अजून सुरू आहे. दरवर्षी या पुरस्काराची घोषणा केली जाते.