Parineeti Raghav Wedding : राघव चढ्ढा आणि परिणिती चोप्रा अडकले लग्नबंधनात, उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडला शाही विवाहसोहळा..


Parineeti Raghav Wedding : अभिनेत्री परिणीती चोप्राने आपचे नेते राघव चढ्ढासोबत लग्न केले आहे. त्यांचा विवाह 24 सप्टेंबर रोजी उदयपूरच्या लीला पॅलेसमध्ये पार पडला. त्यांचे लग्न खूप चर्चेत होते. या लग्नाला बॉलिवूड सेलिब्रिटींपासून जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली. (Parineeti Raghav Wedding)

राघव परिणीतीशी लग्न करण्यासाठी सजवलेल्या बोटीतून लग्नाची मिरवणूक घेऊन पोहोचला होता. चाहते त्यांच्या लग्नाच्या फोटोंची वाट पाहत आहेत. राघव-परिणितीच्या लग्नाआधीचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 23 सप्टेंबर रोजी या जोडप्याचे हळदी, मेहंदी आणि संगीत विधी पूर्ण झाले.

त्यांची संगीताची रात्र अप्रतिम होती. परिणीतीने सिल्व्हर कलरचा लेहेंगा घातला आणि स्टायलिश दागिन्यांसह तिचा लुक पूर्ण केला. राघव ब्लॅक आउटफिटमध्ये दिसला होता. परिणीतीच्या मेहेंदीबद्दल बोलायचे झाले तर तिची रचना खूपच ट्रेंडी होती.

परिणीती आणि राघवच्या लग्नाला मनीष मल्होत्रा, आदित्य ठाकरे, सानिया मिर्झा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आले होते. संगीत रात्री पंजाबी गायक नवराज हंसने परफॉर्म केले होते.

तर परिणीतीची बहीण आणि अभिनेत्री प्रियांका चोप्रा या लग्नात सहभागी झाली नव्हती. परिणीती चोप्राची खास मैत्रिण सानिया मिर्झाने लग्नाला हजेरी लावली होती. सानियाने तिचा फोटो इन्स्टावर शेअर केला आहे.

राघव आणि परिणीती यांची पहिली भेट 15 वर्षांपूर्वी झाली होती. परिणीती यूकेमधील मँचेस्टर विद्यापीठात बिझनेस, इकॉनॉमिक्स आणि फायनान्सचे शिक्षण घेत होती. राघव चड्ढाही त्याचवेळी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकत होते, असे सांगण्यात येते.

याच काळात त्यांची सुरुवातीची ओळख झाली. त्यांची प्रेमकहाणी तेव्हा सुरू झाली जेव्हा परिणीती गेल्या वर्षी पंजाबमध्ये ‘चमकिला’ चित्रपटाचे शूटिंग करत होती आणि राघव तिला भेटायला आला होता.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!