मुलाच्या प्रेमसंबंधाबद्दल ऐकून आई-वडिलांनी केली आत्महत्या, नेमकं प्रकरण काय?

एका तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न केल्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी आपले जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमधून समोर आली आहे. मुलाचे ट्रान्सजेंडरसोबतचे प्रेमसंबंध आई-वडिलांना मान्य नव्हते.
या तरुणाने ट्रान्सजेंडरसोबत लग्न करण्याची देखील इच्छा व्यक्त केली. त्याने इतर आई-वडिलांच्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. समाजामध्ये आपली बदनामी होईल त्यामुळे दोघांनीही टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशच्या नांदयालमध्ये ही घटना घडली. याठिकाणी राहणाऱ्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणासाठी त्याचे आई-वडिल मुलगी शोधत होते. इंजिनिअरचे शिक्षण घेतले असून सुद्धा तो रिक्षा चालवत होता. आपल्या एकुलत्या एका मुलाचं चांगलं व्हावं यासाठी आई-वडील प्रयत्न करत होते.
त्यांनी आपल्या मुलीसाठी एक मुलगी देखील पाहिली होती. पण या तरुणाने त्या मुलीसोबत लग्न करण्यास नकार दिला. या तरुणाचे एका ट्रान्सजेंडरशी प्रेमसंबंध होते. गेल्या ३ वर्षांपासून या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते.
त्याने तिच्यासोबत लग्न करणार असल्याचे आई-वडिलांना सांगितले होते. मुलाचे हे बोलणं ऐकून त्याच्यआई-वडिलांना मोठा धक्का बसला. त्यांनी आपल्या मुलाला ट्रान्सजेंडरसोबत लग्न करण्यास नकार दिला. या तरुणाच्या आई-वडिलांनी किटकनाशक पिऊन आत्महत्या केली.