पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीने संपवलं आयुष्य, १० महिन्यापूर्वी लग्न; कुटूंबियांचा गंभीर आरोप…

मुंबई : मुंबईच्या वरळी भागात घडलेल्या एका घटनेने सध्या खळबळ उडाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे पीए (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

पंकजा मुंडे यांच्या स्वीय सहाय्यकाच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ. गौरी गर्जे असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. १० महिन्यांपूर्वीच पीए अनंत गर्जे आणि गौरी गर्जे यांचा विवाह झाला होता. १० महिन्यातच गौरी गर्जे यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, काल (शनिवारी, ता २२) रात्री अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केली. काही महिन्यापूर्वीच त्यांचं लग्न झालं होतं. या घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम रद्द केल्याची माहिती आहे. मृतदेह रुग्णालयात असून त्यावर पोस्टपार्टम केले जाणार आहे.

पोस्टमार्टममधून सत्य बाहेर येईल, असे सांगितले जात आहे. दरम्यान, पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अनंत गर्जे यांचे लग्न फेब्रुवारी महिन्यात झाल्याची माहिती आहे. या लग्नाला स्वतः पंकजा मुंडे या देखील उपस्थित होते. मात्र, लग्नाच्या अवघ्या १० महिन्यांत अनंत गर्जेंच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.
मात्र, या घटनेनंतर मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. आपली मुलगी आत्महत्या करूच शकत नाही, तर तिची हत्या करण्यात आल्याचा दावा तिच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या मुलीचे कुटुंबीय वरळी पोलीस स्टेशनमध्ये असून त्यांनी सासरच्या मंडळींवर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेण्यास सुरुवात केली असून पुढील चौकशी सुरू आहे.
