काँग्रेसमध्ये प्रवेशाची चर्चा असताना पंकजा मुंडे यांनी घेतला मोठा निर्णय, राजकारणातून घेतली सुट्टी…
मुंबई : राज्यात रोज अनेक राजकीय घडामोडी समोर येत आहेत. यामुळे कधी काय घडेल सांगता येत नाही. आता राज्यात शिवसेनेपाठोपाठ आता राष्ट्रवादीमध्येही उभी फूट पडली आहे. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे अनेकांना धक्का बसला.
राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच आता पंकजा मुंडे मोठा निर्णय घेतला आहे. मला राजकारणातून ब्रेक हवा आहे. सध्याच्या राजकाराणाचा कंटाळा आल्यामुळे दोन महिने सुट्टी घेत आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
मुंबईतील पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या. तसेच त्या म्हणाल्या, मी कायमच पक्षाचा आदेश अंतिम मानला आहे. मी पक्षाच्या विरोधात जात नाही मग माझ्या नैतिकतेवर प्रश्न उपस्थित का केले जातात? असा सवाल उपस्थित करत माझ्या नैतिकतेवर प्रश्न निर्माण करणे हे माझ्यासाठी दु:खद आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे पक्षावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. तसेच पंकजा मुंडे यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची भेट घेतली असल्याची काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. यामुळे आता पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याचे सांगितले जात आहे.
पंकजा मुंडे यांनी दोन वेळा दिल्लीत जाऊन भेट घेतली असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी राज्यातील काँग्रेसचे नेते देखील मध्यस्थी करत असल्याचे सांगितले जात आहे.
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर तर सर्वांनाच ज्ञात आहे. धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. नंतर पंकजा मुंडे यांचे अजून कुठेही पुनर्वसन झाले नाही.