Pankaja Munde : निसटत्या पराभवानंतर पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता, दिल्लीत घडामोडींना वेग…


Pankaja Munde : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक निकालांनी संपूर्ण देशाला आश्चर्याचा धक्का दिला आहे. राज्यातील जनतेनं महाविकास आघाडीच्या बाजूनं कौल दिल्याचं निवडणूक निकालाअंती पाहायला मिळाले आहे.

महायुतीला राज्यात अवघ्या १७ जागा मिळाल्या आहेत, तर महाविकास आघाडीचा ३१ जागांवर विजय झाला आहे. आता लोकसभेच्या निवडणूक निकालांनंतर राज्यातील काही राजकीय समीकरणं बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

महायुतीमधील अनेक दिग्गजांचा पराभव झाला. यामध्ये तीन केंद्रीय मंत्र्यांचा देखील समावेश आहे. भारती पवार, रावासाबेह दानवे आणि कपील पाटील यांचा पराभव झाला. दरम्यान पंकजा मुंडे यांना देखील पराभवाचा धक्का बसला आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव केला.

आता मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार पंकजा मुंडे यांना या जागेवरून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना राज्यसभेचं सदस्यत्व मिळाल्यास बीडला दोन खासदार मिळू शकतात. Pankaja Munde

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला. अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामध्ये पंकजा मुंडे यांचा देखील समावेश आहे. बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला. भाजपकडून यावेळी प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून पंकजा मुंडे यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं.

तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून पुन्हा एकदा बजरंग सोनवणे यांनाच उमेदवारी देण्यात आली होती. गेल्यावेळी प्रीतम मुंडे यांनी बजरंग सोनवणे यांचा पराभ केला. मात्र यावेळी बजरंग सोनवणे यांनी बाजी मारली. त्यानंतर आता पंकजा मुंडे यांना राज्य सभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!