Pankaja Munde : पंकजा मुंडे संदर्भात केंद्र सरकार घेणार मोठा निर्णय! समर्थकांना दिलासा मिळणार…
Pankaja Munde : बीड लोकसभा निवडणुकीत पराभवाचा धक्का बसलेल्या भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आता राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. नुकतीच दिल्लीत भाजप नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली.
या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत चर्चा झाल्याचे समोर आले आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत.
यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
दरम्यान, राज्यात ओबीसी आणि मराठा असा संघर्ष सुरू आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या पंकजा मुंडे यांची राज्यसभेवर नियुक्ती करावी यावर राज्यातील भाजप नेत्यांमध्ये एकमत आहे.
दिल्लीत झालेल्या बैठकीत त्यांना राज्यसभेवर घेण्याची मागणी राज्यातील काही ज्येष्ठ नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे