Pankaja Munde : लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडेंचे मोठे विधान, म्हणाल्या, ‘महिला फुकट पैसे..


Pankaja Munde : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सगळीकडे चर्चा आहे. ही योजना जुलै २०२४ पासून चालू करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत केली जाते.

याच योजनेबद्दल पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. रमाबाई आंबेडकर महिला सबलीकरण केंद्रातर्फे आयोजित ‘धागा’ या स्वदेशी मेळाव्याचे उद्घाटन पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी त्या म्हणाल्या, फुकट पैसे घेणारच नाहीत, त्यांना कर्ज हवे आहे. त्यांना कमीत कमी व्याजदराने किंवा शून्य व्याजाने कर्ज दिल्यास महिला सक्षमपणे उभ्या राहतील. महिलांना केवळ शक्ती देऊन चालणार नाही, तर त्यांना सन्मानही दिला पाहिजे, असे भाष्य आमदार पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले. महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेच्या पार्श्वभूमीवर मुंडे यांचे हे विधान आता चर्चेत आले आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, कोणाकडून काही उधार घेतले, मदत घेतली, तरी महिला ती परत करतातच. आम्ही ग्रामीण भागातील महिलांसाठी शून्य व्याजदराने कर्ज योजना राबविली होती. ९९.७० टक्के महिलांनी कर्ज नियमितपणे फेडले. अशी योजना शहरी बचत गटांसाठीही आणली पाहिजे. यासाठी मी पाठपुरावा करेन. असे ते म्हणाल्या. Pankaja Munde

महिलांकडे गुणवत्ता असली, तरी कुठल्याही क्षेत्रात झगडूनच त्यांना स्वतःला सिद्ध करावे लागते. घरातील महिलेने काम करून उत्पन्न मिळवणे ही काळाची गरज झाली आहे.

एकाच्या उत्पन्नावर घर चालू शकत नाही. ग्रामीण भाग असो वा शहरी, महिला घराची जबाबदारी सांभाळून कामही करतात. मात्र, अशावेळी आपला अहंकार बाजूला ठेवून महिलांना समान अधिकार का मिळत नाही, असा मला प्रश्न पडतो, असेही पंकजा मुंडे यांनी म्हंटले आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!