Pankaj Udhas : संगीत विश्वातील मधुर सूर काळाच्या पडद्याआड! जेष्ठ गायक पंकज उधास यांचे निधन…
Pankaj Udhas : संगीत विश्वातून एक दुखःद बातमी समोर आली आहे. गझल गायक पंकज उधास यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून पंकज उधास हे आजारी होते. आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ७२ व्या वर्षी पंकज उधास यांनी अखेरचा श्वास घेतला.
या घटनेने हिंदी संगीत जगतावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या या निधनावर चित्रपटसृष्टी आणि संगीत क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आज सकाळी ११ वाजता ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील काही दिवसांपासून ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.
पंकज उदास यांनी गायलेली अनेक गाणी, गझल आजही संगीतप्रेमींच्या ओठांवर आहेत. पंकज उधास यांनी गझल गायकीच्या क्षेत्रात आपले एक स्थान निर्माण केले. १९८० मध्ये आहत नावाच्या अल्बमच्या मार्फत त्यांनी आपल्या यशस्वी कारकीर्दीची सुरुवात केली. Pankaj Udhas
या अल्बमने त्यांना व्यावसायिक यशाचे दरवाजे खुले झाले. पंकज उधास यांचे मुकरार, तरन्नम, मेहफिल आदी गाणी चांगलीच लोकप्रिय झालीगझल गायक म्हणून यश मिळवल्यानंतर, महेश भट्ट यांच्या नाम या चित्रपटात पंकज उधास दिसले होते. चिठ्ठी आयी है या गाण्यातून पंकज उधास घराघरात पोहचले. त्यानंतर अनेक हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केले.
जगभरातील अल्बम आणि लाइव्ह कॉन्सर्टमुळे त्यांना गायक म्हणून प्रसिद्धी मिळाली. २००६ मध्ये संगीत क्षेत्रातील योगदानासाठी पंकज उधास यांना पद्मश्री या भारतातील चौथा सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरवण्यात आले.