पाणीपुरी ठरलं कारण! GBS च निदान झालं अन् क्षणात सगळं संपलं, बारामतीच्या किरणसोबत नेमकं काय घडलं?

बारामती : राज्यात जी बी सिंड्रोम आजाराने डोकं वर काढलं असून अनेकांना याची लागण झाली आहे. बारामती शहरात एका तरुणीचा जी बी सिंड्रोम आजाराने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण राजेंद्र देशमुख असे या तरुणीचे नाव आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या तरुणीवर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पुण्यातील सिंहगड परिसरात शिकत असलेल्या बारामतीतील तरुणीला तीन आठवड्यापूर्वी पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्रास सुरू झाला. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. अखेर तिचा मृत्यू झाला आहे.
ती बारामतीत पोहोचल्यानंतर जुलाब आणि अशक्तपणा जाणवू लागला. बारामतीतील रुग्णालयात उपचारासाठी गेल्यानंतर डॉक्टरांना शंका आल्याने त्यांनी पुण्याला उपचारासाठी जाण्याचा सल्ला दिला. नंतर तिच्यावर पुण्यात उपचार सुरू झाले.

असे असताना मात्र तीन आठवडे जी बी सिंड्रोमला दिलेला लढा आज संपला. अखेर उपचारादरम्यान किरणांची प्राण ज्योत मालवली. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. तिची काही लक्षणे अशाच स्वरूपाची दिसू लागल्याने पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी पुण्याला जाण्याचा सल्ला दिला होता. नंतर तिला उपचारासाठी पुण्यात खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
तेव्हाच तिला जीबी सिंड्रोम झाल्याचे निदान झाले. तेव्हापासून तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने तिचे दुःखद निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी जीबीएस आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. जीबीएसचा हा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्यातील यात्रांवर निर्बंध आणले जाण्याची शक्यता आहे.
सध्या राज्यासह पुण्यात जीबीएसचा कहर सूरूच आहे. पुण्यासोबत या आजाराने आता इतर जिल्ह्यात हायपाय पसरायला सुरूवात केली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आणि मृतांच्या संख्येत वाढत होत चालली आहे. ग्रामीण भागात देखील काही रुग्ण आढळले आहेत. यामुळे काळजी वाढली आहे.